सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा, 16 कोरोनामुक्त : कोरोनामुक्तचा आकडा पोहोचला 61 वर




स्थैर्य, सातारा दि. 15 : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक आरोग्य कर्मचारी, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथील 12 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 3 असे एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.




सध्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 26 असे एकूण 61 जण उपचार घेत आहेत. यापैकी 60 रुग्ण लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित एका रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.

47 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह

तसेच उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 6 व  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 41 एकूण 47 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

28 नागरिक विलगीकरण कक्षात

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 17, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 11 असे एकूण 28 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.




जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 62, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 61, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.



Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya