सस्तेवाडीतील दोघे करोना पॉसिटीव्ह; जिल्ह्यातील १६ जणांचे अहवाल आले पॉसिटीव्हस्थैर्य, फलटण, दि. २२ : मूळचे सस्तेवाडी येथील असलेले मुंबईवरून कुटुंबासह आलेले पती-पत्नी इतर आजार असल्याने (कोमाॅर्बिडीटी) व काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांचे स्रावाचे नमुने तपासणीसाठी सिव्हील हाॅस्पीटल सातारा येथे पाठवण्यात आलेले होते. परवानगी काढून न आल्याने सदरच्या कुटुंबाला ३ दिवसांपूर्वीच शेती शाळा येथील विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्रावाचे नमुन्याचे अहवाल पाॅसिटीव्ह आले असल्याची माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

संस्थात्मक अलगीकरणात दाखल असलेला मुंबई येथून आलेला भीमनगर ता. कोरेगांव येथील 27 वर्षीय युवक, संस्थात्मक अलगीकरणात असलेला मायणी ता. खटाव येथील 64 वर्षीय पुरुष,‍ इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला ‍धामणी ता. पाटण येथील निकट सहवासीत 72 वर्षीय पुरुष, इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला शामगाव, कराड येथील निकट सहवासीत 24 वर्षीय पुरुष, वरोशी ता. जावली येथील निकट सहवासीत 52  वर्षीय ‍ महिला, ‍ क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे दाखल असलेले मोजावाडी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष सारीचा रुग्ण,  मुंबई येथून आलेला आसेर ता. वाई येथील 50 वर्षीय पुरुष, गारवाडी ता. खटाव येथील निकट सहवासीत 21 वर्षीय महिला,  मुंबई येथून आलेला फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली फलटण येथील 58 वर्षीय  महिला,  रायघर ता.सातारा येथील निकट सहवासीत  26 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला कासखुर्द येथील 24 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील निकट सहवासीत 36 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला ‍निमसोड ता. खटाव येथील 20 वर्षीय व 48 वर्षीय पुरुष, खापर खैरणे मंबई येथून आलेला गावडी ता. जावली येथील 19 वर्षीय पुरुष असे एकूण 16 जणांचा अहवाल  कोरोना बाधीत आला असल्याची  माहितीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
Previous Post Next Post