‘तो’ कोरोना बाधीत नाही: प्रसाद काटकर
शंकर मार्केटच्या अफवेवर विश्‍वास ठेवू नका


स्थैर्य, फलटण, दि. 23 : मृत्यूनंतर कोरोनाचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आलेल्या मुंबईहून आलेल्या कोळकी येथील व्यक्तीच्या अंत्यविधीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शहरातील एका बेघर व्यक्तीला खबरदारीचा उपाय म्हणून शंकर मार्केट परिसरातील शिवाजी वाचनालयाच्या इमारतीपासून प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. सदरचा इसम कोरोनाबाधित अथवा कोरोना संशयित नाही. मात्र सोशल मिडीयावर सदरच्या व्यक्तीला अ‍ॅम्बुलन्स मधून घेवून जातानाचा व्हिडीओ प्रसारित करुन शंकर मार्केटमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याची अफवा पसरवली जात आहे. तरी अशा अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी ‘स्थैर्य’शी  बोलताना सांगीतले.

कुर्ला, मुंबई येथून अक्षतनगर, कोळकी येथे आलेल्या वृद्धासोबतचे त्याचे चारही कुटुंबीय कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याने शहरात भितीचे वातावरण आहे. प्रशासन याबाबतीत पूर्णत: दक्ष असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नयेे; मात्र दक्ष जरुर रहावे, असेही मुख्याधिकारी काटकर यांनी आवाहन केले आहे.
Previous Post Next Post