सौ. कल्पनाताई गिड्डे यांचेकडून नाईकबोमवाडीत होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप


स्थैर्य, दुधेबावी, दि. २५ : भारतीय जनता पक्षाच्या महिला किसान मोर्चाच्या तालुका अध्यक्षा सौ. कल्पनाताई गिड्डे यांनी नाईकबोमवाडीत ग्रामस्थांना होमिओपॅथी औषधांचे (अर्सेनिक अल्बम ३०) मोफत वाटप केले. यावेळी चद्रकांत चव्हाण , निवृत्ती खुस्पे, ऋषिकेश बिचुकले, सौ. उषा चव्हाण, सौ. कमल चव्हाण, सौ. मनिषा चव्हाण, ग्रामसेवक महादेव आढाव, तलाठी माने यांची प्रमुख उपस्थिती होती.  गावातील हनुमान मंदिरात या औषधांचे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या औषधांचा उपयोग होणार असल्याचे सांगितले. मोफत औषध वाटप केल्याबद्दल नाईकबोमवाडी ग्रामस्थ , सरपंच व पदाधिकारी यांनी सौ. कल्पना ताई गिड्डे यांचे आभार मानले.
Previous Post Next Post