कोळकीतील त्या व्यक्तीच्या कुटुंबातील चौघांचे रिपोर्ट पॉसिटीव्ह


स्थैर्य, फलटण, दि. २३ : कुर्ला, मुंबई येथून कोळकी येथे येऊन मृत्यूनंतर पाॅसिटीव्ह आलेल्या ७४ वर्षीय मयत व्यक्तीच्या कुटुंबातील इतर ४ व्यक्तींचे करोना म्हणजेच कोव्हीड १९ चे रिपोर्ट पाॅसिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये मयत व्यक्तींची पत्नी, सून व दोन नातू यांचा समावेश आहे. कोळकी येथील इतर हाय रिस्क व्यक्तींचा स्वॅब संपर्काच्या ८ व्या दिवशी घेण्यात येणार आहे. कोरोना केअर सेंटरमधील एका हेल्थकेअर व्यक्तीचा घेण्यात आलेला स्वॅबचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. अशी माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
Previous Post Next Post