शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीचे १ लाख कोटींचं पॅकेज-निर्मला सीतारामन
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 15 : शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

इतर महत्त्वाच्या घोषणा

औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायसाठी १५ हजार कोटींची तरतूद, पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी १३ हजार ३४३ कोटींची तरतूद, मत्स्य व्यवसायासाठी २० हजार कोटींची तरतूद, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद, मधमाशी पालन व्यवसायासाठी ५०० कोटींची तरतूद, भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सबसिडी, लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’

गेल्या दोन महिन्यात काय घडलं?

शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. दोन महिन्यात म्हणजेच लॉकडाउनच्या काळात ७४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. ५६० लाख लीटर दुधाचं संकलन करण्यात आलं. देशातल्या २ कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देण्यात आली आहे. दूध उत्पादकांना लॉकडाउनच्या काळात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिल्याचंही स्पष्ट करण्यात आलं
शेती आणि कृषी उद्योगासाठी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. सगळ्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी काम करत असतात असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. मत्स्य व्यवसाय आणि पशुपालन यासाठीही घोषणा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज ११ घोषणा करण्यात येतील ज्यापैकी ८ कृषी क्षेत्राशी संबंधित असतील असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. यात कोणत्या क्षेत्राला काय मिळालं याच्या घोषणा तीन दिवस करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचा आजचा तिसरा दिवस आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya