18 जणांना आज सोडले घरी; 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
101 जणांच्या स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी

स्थैर्य, सातारा दि. 10 :  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8, कोराना केअर सेंटर खावली येथील 1, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णाल, सातारा येथील 2, कोरोना केअर सेंटर, फलटण येथील 4, पार्ले ता. कराड येथील कोरोना केंअर सेंटर मधील 1, सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 2 असे असे एकूण  18 जणांचा रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्यांमध्ये पाटण तालुक्यातील नंदगाव येथील 67 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, गलमेवाडी येथील 24 वर्षीय महिला गावडेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, धामणी येथील 31 वर्षीय पुरुष,  माण तालुक्यातील दहिवडी येथील 50 व 58 वर्षीय पुरुष

वाई तालुक्यातील दहयाट येथील 53 वर्षीय पुरुष.

खावली केअर सेंटर, सातारा येथील सातारा तालुक्यातील    चाळकेवाडी येथील 30 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील येथे दाखल अणाऱ्या 70 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा. कोरोना केअर सेंटर फलटण येथील 34 व 60 वर्षीय महिला,  9 वर्षांचे दोन मुले पार्ले कोरोना केंअर सेंटर मधील 1 महिला सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 21 वर्षीय पुरुष व 44 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारुण रुग्णालय, सातारा येथील 13, पानमळेवाडी येथील 1, शिरवळ येथील 17, कराड येथील 4, वाइै येथील 7, रायगाव येथील 7, मायणी येथील 16, बेल एअर पाचगणी येथील 5, दहिवडी येथील 7, फलटण येथील 19 व कोरेगाव येथील 5 असे एकूण 101 जणांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.   महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे मुंबई वरुन प्रवास करुन आलेल्या 55 वर्षीय पुरुषाचा बेल एअर हॉस्पीटल पाचगणी येथे मृत्यु झाला आहे. या 55 वर्षीय पुरुषाचा नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या 25 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
Previous Post Next Post