फलटण तालुक्यातील करोनाचे ३२ रिपोर्ट निगेटिव्ह तर ३१ प्रलंबित


स्थैर्य, फलटण, दि. ८ : काल (दि. ७ जून) अखेर करोना बाधित असलेले एकूण २८ रुग्ण फलटण तालुक्यात असून ह्या पूर्वी एकूण ९ रुग्ण करोना पासून बरे झाले असून तालुक्यात ४ जणांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे. काल (दि. ०७ जून) अखेर एकूण फलटण तालुक्यात २४७० व्यक्ती होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथे असणाऱ्या करोना केअर सेंटर मधील कन्फर्म वार्ड मध्ये एकूण ४ रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये ८२ व्यक्ती आहेत. काल (दि. ०७ जून) रोजी फलटण तालुक्यातील करोनाचे ३२ रिपोर्ट निगेटिव्ह आले असून अजून ३१ रिपोर्ट प्रलंबित आहेत अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
Previous Post Next Post