जिल्ह्यातील आणखी 8 नागरिक कोरोनामुक्त; आज एकूण 43 कोरोना मुक्त
बरे होणाऱ्यांची संख्या तीनशे पार


स्थैर्य, सातारा दि. 6 : जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर खावली येथून 6 व मायणी येथून 2 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यासाठी  चांगली ठरत चाललेली बाब म्हणजे आज अखेर उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या जास्त असून ती  303 इतकी आहे.

बरे होऊन घरी गेलेल्या मध्ये खंडाळा तालुक्यातील घाटदरे येथील 51 व 70 वर्षीय 2 पुरुष, सातारा तालुक्यातील निंब येथील 30 वषी्रय पुरुष,  जावळी तालुक्यातील मोरघर येथी ल 24 वर्षीय महिला व 3 वर्षीय बालक, आणि खटाव तालुक्यातील बनपूरीतील 38 वर्षीय पुरुष व शेळकेवाडी येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

रात्री 8 पर्यंत जिल्ह्यातील कोरोना अपडेट असे आहे, एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या 620 इतकी झाली असून 6835 नमुने हे निगेटिव्ह आले आहेत.  एकूण बाधित रुग्णांपैकी 303 इतके बाधित रुग्ण बरे पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.  तर 291 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत कोरोनाने मृत्यु झालेल्यांची संख्या 26 इतकी आहे.
Previous Post Next Post