साताऱ्यात भंगार दुकानाला लागली भीषण आग
स्थैर्य, सातारा, दि. 08 : सातारा शहरातील सातारा कोरेगाव रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाजवळ चाहूल गावाकडे जाणाऱ्या सर्विस रोडवरील भंगारच्या दुकानाला रविवारी रात्री अचानक उशिरा आग लागली .या आगीमध्ये सर्व दुकान जळून खाक झाले असून ही आग पहाटेपर्यंत विझविण्याचे काम सुरू होते रात्री अकराच्या सुमारास ही आग लागल्यानंतर परिसरातील काही नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्यामुळे अखेर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले .या आगीमध्ये प्राथमिक माहितीनुसार लाखो रुपयांचे नुकसान  झाले आहे. डोळ्यादेखत आपले दुकान आगीच्या वेड्यात लपेटलेले पाहून दुकान मालक आणि कुटुंबियांना रडू कोसळले होते..
Previous Post Next Post