वन महोत्सवानिमित्त युवक गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम
1 ते 7 जुलै दरम्यान करणार मोफत रोपांचे वाटप


स्थैर्य, फलटण, दि. ३० : सध्या वाढत्या वसाहती/औद्योगिकीकरणामुळे व लोकसंख्येमुळे  प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून फलटण शहरातील शुक्रवार पेठ येथील युवक गणेशोत्सव मंडळातर्फे अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

दि.1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सवानिमित्त मंडळाच्यावतीने वड, शिसु, करंज, चिंच, वर्षांवृक्ष (रेन ट्री), कडुलिंब, कांचन, आवळा, पेरू (लाल) इत्यादी झाडांची रोपे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. रोपांची 2/3 वर्षे काळजी घेण्याच्या अटीवर ही रोपे देण्यात येणार असून अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्यकर्ते साजेब आतार - 7020660581, जय चवंडके - 7385411735 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post