करोनाचा रुग्ण सापडल्याने बोरिव सह रहिमतपूर परिसरात भीतीचे वातावरण
स्थैर्य, रहिमतपूर, दि. ०९, (अविनाश कदम) : बोरीव (रहिमतपूर) ता कोरेगाव येथे आज कोरोना व्हायरस पेशंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बोरीव सह रहिमतपूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बोरीवमध्ये इतर गावा प्रमाणे मुंबई वरून एक कुटुंब आले या कुटुंबाला आल्यापासून घरामध्ये होम क्वारंटाईन करण्यात आले होते. 4 दिवसा पूर्वी त्या मधील पुरुष माणसाला त्रास झाल्याने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले व त्याची कोरोना चाचणी केली त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बोरीव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज कोरेगावच्या प्रांताधीकारी नलवडे तहसीलदार पवार मंडलाधीकारी तलाठी सदावर्ते  पोलीस पाटील दीपक नाईक स पो नि घनश्याम बल्लाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. काकडे गमरे यांनी भेटी देऊन सरपंच वर्षा देशमुख व ग्राम पंचायत सदस्य व कोरोना कमिटीला सूचना देऊन बाधित भाग सील केला किराणा दुकानदार यांना सूचना देऊन मोबाईल वर ऑर्डर घेऊन स्वयंसेवक मार्फत किराणा साहित्य घरपोच करण्याच्या शेतकरी शेतमजूर यांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्या मुंबई वरून आलेल्या पॉझिटिव्ह पेशन्टच्या   घरातील 3 व्यक्ती व ज्या वाहनाने पेशनट सातारा येथे नेला तो ड्रायव्हर व त्याचे कुटुंब होम क्वारंटाने करण्यात आले.
Previous Post Next Post