" विनायक अन्नछत्रात (कम्युनिटी किचन) " तर्फे घरपोच जेवणाची व्यवस्था
स्थैर्य, लोणंद, दि. 08 : कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन परिस्थितीत गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊन अनेक सर्व सामान्य जनतेच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना याची दाहकता विचारांत घेऊन लोणंद शहरात कोणी उपाशी राहू नये म्हणून सर्व प्रथम साथ प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेचे वतीने गरजवंतांना घरपोच जेवणाची व्यवस्था करण्यात येऊन अन्नछत्राची बिजे रोवली होती.

साथ प्रतिष्ठान वतीने या राबविण्यात आलेल्या उपक्रमास पाठबळ देत हा उपक्रम असाच पुढे अविरत सुरू ठेवण्यासाठी स्व.विनायकराव शेळके पाटील यांच्या स्मरणार्थ कार्यरत राहण्यासाठी नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील व कै.आनंदा सुर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्ट चे पवन सुर्यवंशी पुढे सरसावले व तिन्ही संस्थाचे रुपांतर " विनायक अन्नछत्रात (कम्युनिटी किचन) " झाले.

" गोर गरिब गरजवंतांसाठी चला चुल पेटवूया.. " या उपक्रमांतर्गत" स्व.विनायकराव शेळके पाटील यांच्या स्मरणार्थ, साथ प्रतिष्ठाण लोणंद व कै.आनंदा सुर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच दानशूर मान्यवरांचे सहकार्याने विनायक अन्नछत्र (कम्युनिटी किचन) मंगळवार दिनांक 05 मे 2020 ते शुक्रवार 05 जुन 2020 असे 31 दिवस अविरत सुरू होते.
या उपक्रमास केलेल्या आवाहनास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला अनेक दानशूर मान्यवर व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 31 मे नंतर काही निर्बंध शिथिल करून हळूहळू अनेक उद्योग, व्यवसाय पुर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्नाने अनेक रोजगार सुरळीत सुरू होत गरजवंतांची संख्या कमी झाली याकारणे शुक्रवार दिनांक 05 जुन पर्यंतच अन्नछत्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

विनायक अन्नछत्र (कम्युनिटी किचन) माध्यमातून सुमारे 20,000 हुन अधिक फुडपॅकेट्स चे गरजवंतांना वाटप करण्यात आले याच बरोबर लोणंद शहरातील परराज्यातील अनेक कुटुंबे हालाकीची परिस्थिती व हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने स्थलांतरित होत असताना सामाजिक बांधिलकी जपत त्यांना दुर च्या प्रवास काळात तहान भुक लागली तर गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याच्या बाटल्या, फळे, बिस्किटे आदी खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

या निस्वार्थी सेवेची दखल घेत सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल तथा सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दुरध्वनी द्वारा शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले तर वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांनी समक्ष भेटीद्वारे समाधान व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या तसेच आमदार मकरंद आबा पाटील यांचे मोठे बंधू मिलिंददादा पाटील यांचे वेळो वेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

अन्नछत्र ठिकाणी अनेक व्यापार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समक्ष भेटी देत कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

अन्नछत्र सांगता प्रसंगी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना सेनिटायझर बाॅटल, मास्क, मिठाई तसेच होमिओपॅथी अरसेनिक अल्बम च्या गोळ्या भेट देऊन सत्कार करण्यात आला.

उपक्रम यशस्वीते साठी नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, कै. आनंदा सुर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्ट चे पवन सुर्यवंशी,प्रसिद्ध व्यापारी रमेश शेळके पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुनील शेळके पाटील, साथ प्रतिष्ठानचे सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, कार्याध्यक्ष स्वप्नील बुरुंगले, सुनील रासकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव जाधव, विशाल काळे, सचिन चव्हाण, भावेश दोशी, शिवाजी भोसले, बनसोडे वस्ताद, संतोष राऊत, शशिकांत कुंभार, प्रज्वल माचवे, संजय भोसले, आकाश धोतरे आदींनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post