महिलेला अश्लील इशारा करण्याचा जाब विचारणाऱ्या दोघांवर वार : दोघांवर गुन्हा
 स्थैर्य, सातारा, दि. 06 : महिलेला अश्लील इशारा का केला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या दोघांवर कोयता आणि चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना भिमाबाई आंबेडकर नगरात पाच दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संजय एकनाथ माने, रोहित संजय माने (रा. आंबेडकर नगर, सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मित्राच्या पत्नीला संजय माने हा लांबूनच हाताने अश्लील इशारा करत होता.
याची माहिती आसिफ मज्जीद शेख (वय १९, रा. भिमाबाई आंबेडकर नगर, सदर बझार सातारा) व त्याच्या मित्राला मिळाली. त्यानंतर दोघेजण माने याला जाब विचारण्यास गेले. त्यावेळी आसिफ याच्या खांद्यावर कोयत्याने तर त्याच्या मित्राच्या उजव्या हातावर चाकूने दोघांनी वार केले.

यामध्ये दोघेही जखमी झाले. रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर आसिफने शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संजय माने आणि रोहित माने या दोघांवर गुन्हा दाखल केला.
Previous Post Next Post