कर्नाटक विधानपरिषदेच्या सात जागांसाठी व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
स्थैर्य, नवी दिल्ली, 10 : कर्नाटक विधानपरिषदेच्या सात आमदारांची मुदत येत्या 30 जून 2020 रोजी संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी विधानपरिषदेच्या व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

कर्नाटक विधान परिषदेच्या ज्या सदस्यांची दि. 30 जून 2020 रोजी मुदत संपत आहे, त्यांची नावे- नसीर अहमद,  जयाम्मा, एम.सी. वेणुगोपाळ, एन.सी बोस राजू, एच.एम. रेवण्णा, टी.ए.श्रावण, डी.यू मल्लिकार्जन अशी आहेत.

या विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल समाप्त होत असल्याचे कर्नाटक मुख्य निवडणूक अधिका-यांनी कळविल्यानंतर निवडणूक आयोगाने या व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 11 जून 2020 रोजी (गुरूवार) निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांसाठी दि. 18 जून 2020 (गुरूवार) अर्ज दाखल करण्याची अखेरचा दिवस असेल. उमेदवारांच्या अर्जाची छाननी दि. 19 जून, 2020 (शुक्रवार) रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारांना आपले अर्ज दि. 22 जून 2020 पर्यंत (सोमवार)मागे घेता येणार आहेत. मतदान दि. 29 जून, 2020 रोजी (सोमवार) सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे दि. 29 जून 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दि. 30 जून, 2020  पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मुक्त आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ते निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहेत.

या निवडणुका घेताना कोविड-19 महामारीचा धोका लक्षात घेवून शारीरिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांना आवश्यक त्या ठिकाणी वरिष्ठ अधिका-यांची निवडणूक नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Previous Post Next Post