घरकुलांबाबत ग्रामपंचायत स्तरावरुन नियोजन करुन कामे पुर्ण करा : श्रीमंत संजीवराजे


स्थैर्य, फलटण : चौदाव्या वित्त आयोगातील निधी १५ जुलै २०२० अखेर खर्च करणेबाबत सरंपच / ग्रामसेवक यांनी नियोजन करणे आवश्यक असलेचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सुचीत केले. खर्च केलेल्या व कामे पुर्ण केलेल्या तालुक्यातील चांभरवाडी, कोरेगांव, कापडगावं, काळज, तडवळे, माळेवाडी, शिंदेमाळ, कुसूर, जाधववाडी (फ), परहर, भाडळी खु।। व कोळकी या ग्रामपंचायतीचे आमदार दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले. तसेच जी कामे सुरु होणार नाहीत त्या कामांचे काम बदल प्रस्ताव तात्काळ देणेबाबत सुचीत करणेत आले. तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजने अंतर्गत अपुर्ण - सुरु नसलेल्या घरकुलांचा आढावा घेणेत आला. सदर अपुर्ण सुरु नसलेली घरकुलांबाबत ग्रामपंचायत स्तरावरुन नियोजन करुन कामे पुर्ण करणेबाबत ग्रामसेवकांना सुचना देणेत आल्या तसेच ज्या ग्रामपंचायतीकडे गावठानांची जागा नाही त्यांना खाजगी जागा खरेदीसाठी पंडीत दिन दयाळ योजने अंतर्गत घराचे बांधकामासाठी जागा खरेदी करणेसाठी प्रस्ताव सादर करणेबाबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सुचीत केले.

ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामे / योजनांची जिल्हा परिषद गटनिहाय आढावा सभा दिनांक २४/६/२०२० व दिनांक २५/६/२०२० फलटणचे आमदार दिपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर आढावा सभेसाठी पंचायत समिती फलटण सभागृहामध्ये सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर - खर्डेकर, उपसभापती सौ.रेखाताई खरात, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, जिल्हा परिषद सदस्या सौ.भावना सोनवलकर, सौ . उषादेवी गावडे, सौ.जिजामाला नाईक - निंबाळकर, फलटण पंचायत समिती सदस्य बाळासो ठोंबरे, सचिन रणवरे, संजय कापसे, संजय सोडमिसे, पंचायत समिती सदस्या सौ.प्रतिभा धुमाळ, सौ.कोळेकर, सौ.सुशिला नाळे, गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, प्र.सहा गटविकास अधिकारी के.बी उदमले, पंचायत समिती अधिनस्त सर्व खातेप्रमुख, विस्तार अधिकारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी इमारत विजकनेक्शन व नळ कनेक्शनबाबतचा आढावा इंगळे यांनी आढावा घेतला. यामध्ये ज्या अंगणवाडीना विजकनेक्शन व नळ कनेक्शन नाही, त्यांनी दिनांक १५ जुलै २०२० पुर्वी विजकनेक्शन व नळ कनेक्शन जोडणी करणे व त्याबाबतचा अहवाल एबासेयो प्रकल्प फलटण या विभागाला देणेबाबत सुचीत करणेत आले. ज्या अंगणवाडी प्राथमिक शाळेमध्ये भरतात त्यांनी स्वतंत्र मिटर न घेता शाळेमधून लाईटची व्यवस्था करणेबाबत सुचीत केले. दिनांक २७/५/२०२० चे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडील परिपत्रकानुसार ग्रामपंचायत हददीमध्ये येणाऱ्या कारखान्यांच्या तसेच मोबाईल टॉवर व विटभटटी तसेच स्टोन क्रशर यांच्या नोंदी घेणे व कर आकारणेबाबत ग्रामपंचायीना सुचीत करणेत आले. दिनांक १८ जुलै २०१६ चे शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीकडील प्रलंबीत मिळकतीचे नोंदीबाबत कारवाई करणेबाबत सांगितले. यावर विनापरवाना बांधकाम CS तसेच प्रलंबीत सिळकतीच्या नोंदी यावर कर आकरणी करणेबाबत सुचना गविअ डॉ.अमिता गावडे यांनी दिल्या .

कोविड १ ९ संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोटे यांनी तालुक्यात ६ पॉझीटीव्ह रुग्णांची माहिती दिली. तसेच कोविड सेंटर केंद्राबाबत करणेत येणाऱ्या उपपाययोजना व कामकाजाबाबत माहिती दिली. जिल्हाबाहेरील व्यक्तीबाबत तपासणी घेणे आवश्यक असून त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीस तात्काळ सुचना देणेबाबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सुचीत केले. तसेच विनापरवाना येणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करणेची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीची असून पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांनी याबाबत योग्य ती कारवाई करणेबाबत सुचीत करणेत आले. गट विकास अधिकारी डॉ.गावडे मॅडम यांनी ग्रामपंचायतीकडून प्रती व्यक्ती दोन मास्क वाटप करणेचे असून ज्या आशा कर्मचारी यांचेकडून ग्रामपंचायतीकडे पॉझीटीव्ह रुग्णाबाबत अहवाल प्राप्त होईल त्यांना प्रोत्साहनपर भत्ता आरोग्य विभागामार्फत (एनएचएम मधून) देण्यात येणार असलेचे सांगितले. ग्रामपंचायत मोकळया जागा, सरंपच / उपसरंपच मानधन गिरवी - धुमाळवाडी व सासकल रस्ता याबाबत चर्चा करणेत आली. ग्रामपंचायत करवसुलीबाबत, ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनांचा निधी मुदतीत खर्च करणे दैनंदिन कामकाजासाठी ग्रामसेवकांनी सजामध्ये उपस्थित रहावून कामकाज करणेबाबत सुचीत करणेत आले.

सन २०२० साठी केंद्र शासनाचेकडून पंडीत दिन दयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने जिल्हा परिषद सातारा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने गौरविलेबाबत, सदर योगदानाबाबत मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा पंचायत समिती फलटण सभागृहात उपस्थित सरपंच / ग्रामसेवक यांचेवतीने अभिनंदनाचा ठराव सरपंच जिंती यांनी मांडला व पंचायत समिती सभागृहामध्ये सर्वानुमते टाळया वाजवून मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन करुन ठराव सर्वानुमते मंजूर करणेत आला.फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपलेचे जाहीर केले.
Previous Post Next Post