येरवड्यात सात कोटीं रुपयांच्या बनावट नोटा जप्त ; लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेची कारवाई
स्थैर्य, पुणे, 10 : पुणे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येरवडा परिसरात संजय पार्कमध्ये डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली आहे. आरोपीकडून 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा आणि 2 लाख 80 हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आरोपी डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Previous Post Next Post