ढेबेवाडी विभाग राष्ट्रवादीकडून आ. गोपीचंद पडळकरांचा निषेध
स्थैर्य, पाटण, दि. 28 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा, देशाचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून ढेबेवाडी विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.

ढेबेवाडी, ता. पाटण येथे विभागातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एस.टी. स्टँड परिसरातील चौकांमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी आणलेल्या बॅनर वरील आ. गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला.

यावेळी पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव देसाई, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, खरेदी-विक्री संघाचे संचालक आत्माराम कदम, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सचिन जाधव, सणरबूरचे उपसरपंच संदीप जाधव, पाटण तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अंकुश मोंडे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयसिंह वाघ, डी. एस .पाटील, सदाशिव जाधव, आण्णा लोहार, अभिजित जानुगडे, सचिन वाघमारे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya