घाबरु नका मी तुमच्या सोबत आहे : श्रीमंत विश्वजितराजे


स्थैर्य, दुधेबावी : कोरोना रोगाला घाबरु नका प्रशासनाने सांगितलेले नियम पाळा यानंतरही ग्रामस्थांना काही झाल्यास घाबरून जाऊ नका मी तुमच्या सोबत आहे, असे मत युवा नेते व पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

दुधेबावी ता. फलटण येथे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मनातील विविध संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पोलीस पाटील हणमंतराव सोनवलकर,  राष्ट्रवादीचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत नाळे, ग्रामपंचायत सदस्य सौ. स्वाती नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत विश्वजितराजे यांनी कोरोना दौरा सुरू केल्यानंतर दुधेबावी येथून शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या या दौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळत असून युवकांच्या मनातील विविध गैरसमज दूर होण्यास या निमित्ताने मदत होत आहे. 

कोरोना रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला असून ग्रामस्थांनी आरोग्य विभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांना सहकार्य करावे. गावामध्ये ग्रामपंचायत निधी कमी पडल्यास आम्हाला कळवा निधी उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करु असेही विश्वजितराजे यांनी स्पष्ट केले. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य सेवक अहिवळे, तलाठी इंगळे, ग्रामविकास अधिकारी बोबडे, क्रुषी सहाय्यक पवार यांनी करोनाच्या सद्य साथीबाबत श्रीमंत विश्वजितराजे यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब मोरे, सुरेश नाळे, नानासाहेब सोनवलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

करोनाच्या काळात गाव पुढारी झोपले आहेत काय ?

यावेळी ग्रामविकास अधिकारी बोबडे यांनी गावातील मान्यवर व पदाधिकारी यांनी गरीब लोकांना जीवनावश्यक किटचे वाटप केल्याची माहिती दिली. मात्र यामध्ये गावातील एका जबाबदार नेत्याने व गावातील गाव पुढार्यांनी गावातील गरीब लोकांना काहीसुद्धा दिले नाही. आता करोनाच्या परिस्थितीमध्ये नेत्यांच्या पुढे मागे मिरवणारे गाव पुढारी झोपले आहेत कि काय ? अशी चर्चा कार्यक्रम संपल्यानंतर गावात दबक्या आवाजात सुरू होती.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya