शासनाने सलुन व्यवसाय सुरु करणेची परवानगी द्यावी किंवा सलुन व्यवसायिकांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी : नाभिक महामंडळाची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. १० : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजपर्यत नाभिक व्यवसायिकांची सर्व सलून दुकान बंद असल्याने नाभिक व्यवसायिकांची उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाने सलुन व्यवसाय सुरु करणेची परवानगी द्यावी किंवा सलुन व्यवसायिकांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हा यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. 

लॉकडाऊन मध्ये टप्या टप्याने अनेक व्यवसायिकांना दुकाने सुरु करणेस सुट देण्यात आली असून नाभिक समाजाच्या सलुन व्यवसायावर अनेकांचा उदरनिर्वाह असून व्यवसाय बंद असल्याने कुंटुबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सलून कारागीर व भरपाई मदत शासनाने तातडीने द्यावी. दुकान भाडे, लाईट बील, घरभाडे माफ करावे, व्यवसायासाठी काढलेले कर्जा बाबत सवलत मिळावी. सलून व्यावसायिकांना दरमहा १० हजार रुपये मदत मिळावी शासनाने आरोग्य कर्मचारी, आशा, पोलिस, पञकार आदींना विमा संरक्षण दिले आहे त्या प्रमाणे सलून व्यावसायिकांना पण विमा संरक्षण द्यावे, आदी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्या मार्फत दिले आहे. 

सदरील निवेदनाची शासनाने त्वरीत दखल न घेतल्यास आगामी काळात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा हि महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने देण्यात आलेला आहे. 
Previous Post Next Post