कारंजा लाड येथील सिंधी कॅम्प परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राला पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट
स्थैर्य, पाटण, दि. 30 : कारंजा लाड येथील सिंधी कॅम्प परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राला (कंटेन्मेंट झोन) पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देऊन येथील उपाय योजनांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना होत असलेला भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, नागरिकांची आरोग्य तपासणी, कोरोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींची आरोग्य तपासणी आदी बाबींची माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांनी जाणून घेतली.
Previous Post Next Post