महिलेवर वार करून दागिने लुटले
स्थैर्य, पांचगणी, दि. 09 : वाई येथील पेटकर कॉलनीत मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घरात घुसून महिलेवर चाकूचे वार करून सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. त्यामुळे वाई शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात होताच घटनास्थळी वाई पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,डॉग स्कॉड दाखल झाले. हल्लेखोरांनी सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे दागिने पळविले आहेत अशी माहिती मिळाली. तसेच चोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक बराच वेळ परिसरात शोध घेत होते.
Previous Post Next Post