लॉक डाऊन काळातही शेतमाल विक्री व रास्त दर मिळवून देण्यात फलटण बाजार समिती यशस्वी : श्रीमंत रघुनाथराजे


स्थैर्य, फलटण, दि. ८ : कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या आवारातील साप्ताहिक भूसार बाजार, दररोज सकाळी फळे, भाजीपाला मार्केट सुरळीत सुरु असून लॉक डाऊनच्या कालावधीत विक्रीस आलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्यात बाजार समिती यशस्वी झाल्याचे बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

बाजार समितीच्या आवारातील साप्ताहिक भुसार बाजारात आवक वाढत आहे. आज (रविवार) भुसार बाजारात ज्वारी २३३ क्विंटल आवक झाली असून दर प्रति क्विंटल २००० ते ४२५२ रुपयांपर्यंत, बाजरी आवक २१३ क्विंटल, दर प्रति क्विंटल १६०० ते २२३५ रुपयांपर्यंत, गहु आवक ३३८ क्विंटल, दर प्रति क्विंटल १७०० ते २४२५ रुपये, हरभरा आवक १०७ क्विंटल, दर प्रति क्विंटल ३८०० ते ४५६६ रुपये, मका आवक ४०३ क्विंटल, दर प्रति क्विंटल १२५० ते १३३० रुपये, तूर आवक १२ क्विंटल, दर प्रति क्विंटल ४१६० रुपये, खपली आवक ५ क्विंटल, दर प्रति क्विंटल ३१९९ ते ४००० रुपये पर्यंत तेजीत निघाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीस आणताना वाळवून, प्रतवारी करुन आणावा, म्हणजे स्पर्धात्मक दर मिळण्यात अडचण येणार नाही असे प्रतिपादन बाजार समितीचे व्हा. चेअरमन भगवानराव होळकर यांनी केले आहे.
Previous Post Next Post