निवृत्त तहसीलदार शिवाजीराव जाधव यांचे निधन
स्थैर्य, सातारा, दि. 30 : शाहूपुरीतील ज्येष्ठ नागरिक माजी तहसीलदार शिवाजीराव अनंत जाधव यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे मूळ गाव वडूज, ता. खटाव होते. सध्या ते शाहूपुरीतील गणेश हौसिंग सोसायटीत वास्तव्यास होते. तहसीलदार म्हणून त्यांनी वाई, दहिवडी येथे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, नातवंडे तसेच दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शाहूपुरीतील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post