सराईत चोरटा गजाआड
स्थैर्य, मालवण, दि. 10 : मालवण तालुक्यातील रेवंडी श्रीदेवी भद्रकाली मंदिर आणि धामापूर येथील सातेरी मंदिर या मंदिरांच्या फंडपेट्या फोडून लंपास झालेला सराईत चोरटा मालवण पोलिसाने ताब्यात घेतला आहे. संशयास्पदरीत्या फिरताना सावंतवाडी परिसरात या संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. मालवण पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Previous Post Next Post