पावसाळ्यात होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सातारा महामार्ग पोलीस यंत्रणा सज्ज
स्थैर्य, सातारा, दि. २८ : पावसाळ्यात होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सातारा महामार्ग पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून आशियाई महामार्गावरील विविध ठिकाणी असलेले अपघात प्रवण क्षेत्रात महामार्ग पोलिसांनी उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने रिफ्लेक्टर लावल्याने पावसाळ्यात होणाया अपघातांच्या संख्येत घट होण्यास मदत होणार असल्याचे मत सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी व्यक्त केले

महामार्ग पोलीस नेहमी तत्परता दाखवित असतेच,त्यामुळे जून ते सप्टेंबर च्या दरम्यान पावसाळ्यात अनेकदा महामार्गावर दुचाकी घसरने, चार चाकी तसेच अवजड वहानांचे अपघात जोरदार पावसाने तसेच दाट धुके यामुळे होत असतात,यावर नियंत्रण यावे यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला अपघात टाळण्याच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) असलेल्या खंबाटकी घाट, तसेच अपघातांचे प्रमाण जास्त असलेल्या खंडाळा जवळील एस कॉर्नर येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा संजय  राऊत यांच्या साहाय्याने महामार्ग पोलीस चे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुरव पोलिस नाईक मनोज गायकवाड़ यांच्या सह अन्य पोलिस कर्मचारी यांनी रिफ्लेक्टर लावण्यास मदत केली

रिफ्लेक्टर लावल्याने वाहन चालविताना चालकांस मदत होवून अपघात टाळण्यास मदत होणार असून,चालकानी देखील वाहतूकीच्या नियमांचे पालन केल्यास होणाया अपघातांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येवू शकते.
Previous Post Next Post