जिल्हा पोलीस अधीक्षक सातपुतेंच्या नेतृत्वाखाली पोलिसांची चमकदार कामगिरी
स्थैर्य, सातारा, दि. 29 : जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाने 2019 ते मे 2020 या कालावधीम चमकदार कामगिरी केली आहे. गुन्ह्यांचा आलेख खाली आणतानाच विविध प्रकाराच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला असून वर्षभरात 15 जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे तर 262 गुन्हेगारांना जिल्हय़ातून हद्दपार करत गुन्हेगारीवर वचक बसवला आहे. पोलीस दलाला आधुनिक करतानाच जिल्हय़ातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न एसपी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस दलाने करतानाच आपत्तीच्या परिस्थितीत जनतेशी मैत्रीचे नातेही प्रस्थापित केले आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2019 ते माहे मे 2020 या कालावधीमध्ये एसपी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हयामध्ये दाखल झालेले खुनाचे 71 गुन्हे, खुनाचा प्रयत्न 132 गुन्हे, दरोडयाचे 39 गुन्हे, जबरी चोरीचे 112 गुन्हे, चेन स्नेचिंगचे 11 गुन्हे, घरफोडी चोरीचे 107 गुन्हे, इतर चोरीचे 516 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी जिल्हयामध्ये प्रभावीपणे नाकाबंदी, कोंबिग ऑपरेशन, रेकॉडवरील गुन्हेगार चेक केले जात असल्याने गुन्ह्यांचा आलेख खाली आला आहे.
 
मोक्का कायदयान्वये गुन्हेगारी टोळयांवर 15 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत एकूण 262 गुन्हेगारांना जिल्हयातून हद्दपार करण्यात आलेले असल्याने नागरिक निर्भय वातावरणात जगत आहेत.  एसपी सातपुते यांनी निर्भया पथकासाठी फिनोलेक्स कंपनीकडून 3 बलेरो जीप प्राप्त करुन घेतल्या असून त्या तीनही बलेरो जीपमधून निर्भया पथकाची कामगिरी उंचावली असून युवती, महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण घटले आहे.

आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याकरीता महिन्याच्या पहिल्या शनिवारी मेळावा आयोजित करुन त्यांच्या तक्रारी सोडविल्या जातात. महिला संबंधातील तक्रारी, जेष्ठ नागरिक संदर्भातील तक्रारी व बालकांबाबतच्या तक्रारींचे निवारणाकरीता भरोसा सेल स्थापन करण्यात आले असून त्याचे उद्दिष्ट महिला तक्रारी, जेष्ठ नागरिक व बालकांसदर्भातील तक्रारी समस्या सोडविण्याचे काम यशस्वीपणे सुरु आहे.

विकास करताना ऋणानुबंधही जपले

पोलीस कल्याण अंतर्गत पोलीस मुख्यालय सातारा मैदानावर सुसज्ज लॉन तयार केले असून सातारा म्हसवे बट येथे वृक्षारोपण केले. तर ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा वाढदिवस आहे त्यांना पोलीस अधीक्षकांच्या सहयांचे शुभेच्छा पत्र व एक दिवसाची सुट्टी जाहीर केली करत पोलीस बांधवांशी ऋणानुबंध जपले आहेत तर  त्याप्रमाणे पोलीस कल्याण अंतर्गत पेट्रोल पंपाची मंजूर घेण्यात आलेली आहे. 

पारधी समाजाला दिली शिक्षण, उद्योगांची दिशा 

आर्थिकदृष्टया मागासलेल्या पारधी समाजाफरीता मेळावा आयोजित करुन त्या मेळाव्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती येथील अधिकारी हजर ठेवून त्यांच्याकडून पारधी समाजासाठी काय सवलती आहेत किंवा छोटे मोठे उद्योगधंदे करण्यासाठी काय योजना आहेत याबाबत कार्यशाळा आयोजित केली होती तसेच पारधी समाजातील उच्चशिक्षीत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्ज व वहयांचे वाटप केले आहे. 

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन
 
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कमी दरामध्ये घर साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध व्हावे याकरीता सागरिका कॅन्टीनचे नुतनीकरण करण्यात आलेले आहे. आरसीपी प्लाटून करीता सर्व सुखसोयींनी युक्त विश्रांतीगृह बांधण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये उत्कृष्ठ खेळाडू निर्माण होण्याकरीता सुसज्ज असे क्रिडा संकूल पोलीस परेड ग्राऊंड सातारा येथे निर्माण करण्यात आलेले आहे. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी ऑडीओ क्लिप, व्हिडीओ क्लीप, ग्रुप कॉल व व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून सुचना, मार्गदर्शन करण्याचे सुरु आहे. 

कोरोना स्थितीत पोलीस बनले मित्र

कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदीत गरीब व गरजू अशा 6 हजार 150 कुटुंबांना अन्न धान्याचे वाटप केले. तर कर्तव्यावर असणारे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्डस् यांना फेस शिल्ड, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क, थर्मामिटर, ऑक्सिमिटर, गॉगल्स, विटॅमिन डी 3 गोळया, आर्सेनिक गोळया, मल्टी विटॅमिन गोळया, हायड्रोक्लोरीक गोळया यांचे वाटप करण्यात आलेले आहे. तर वय वर्षे 55 वरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या इच्छेनुसार रजेवर सोडण्यात आलेले आहे. 50 ते 55 वर्षावरील कर्मचारी, गर्भवती महिला, को मॉर्बीड कर्मचारी यांना कार्यालयीन कर्तव्य देण्यात आलेले आहे.
Previous Post Next Post