प्रशिक्षण विमान कोसळले : पायलटसह प्रशिक्षकाचा मृत्यू
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 8 : ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यातील कामाख्यानगरमध्ये एका प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला. यामध्ये ट्रेनी पायलटसह प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर कंकडबडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ते कोसळले. गती या सरकारी विमान प्रशिक्षण संस्थेचे हे विमान होते. ढेंकनालचे जिल्हाधिकारी बी. के. नायक यांनी सांगितले, की दोन्ही पायलटना कामाख्यानगरच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस आणि जिल्हाधिकारी हजर झाले होते. विमान अपघात हा तांत्रिक अडचण किंवा खराब हवामानामुळे झाल्याचा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. कामाख्यानगर   पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. दलुआ यांनी सांगितले, की प्रशिक्षक हा पुरुष होता. परंतु त्याची ओळख पटलेली नाही. काही वृत्तवाहिन्यांनुसार मृतांमध्ये महिलेचाही समावेश आहे.
Previous Post Next Post