काय आहे नक्की फलटण तालुक्यातील करोनाची स्थिती?



स्थैर्य, फलटण, दि. २७ : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली चिंताजनक गोष्ट म्हणजे 13 मधली काही लक्षणं नव्याने समोर आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागतं. एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात. अशामध्ये नेमकी फलटण तालुक्याची सध्याची स्थिती काय आहे ? फलटण तालुक्यात करोनाचे रुग्ण किती आहेत ? फलटण तालुक्यातून करोनाचे किती रुग्ण बरे झाले आहेत ? फलटण तालुक्यात किती रुग्ण मृत्यू झाले आहेत ?  असे प्रश्न फलटणकरांच्या मनात उपस्थित झाले आहेत. त्या बाबत आम्ही फलटणचे प्रभारी तहसीलदार रमेश पाटील यांच्या कडून माहिती घेतली तर त्यांनी दिलेल्या माहिती नुसार फलटण तालुक्यात करोनाचे एकूण रुग्ण ६६ असून करोनामुक्त झालेले रुग्ण ४५ आहेत तर ऍक्टिव्ह म्हणजेच आता उपचार चालू असलेले रुग्ण १५ आहेत तर ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.  या सोबतच फलटणचे प्रभारी तहसीलदार रमेश पाटील यांनी फलटण शहरामध्ये रविवार पेठ, मंगळवार पेठ व सोमवार पेठ तर तालुक्यात शेरेचीवाडी, फडतरवाडी, वडले, बरड आणि कोरेगाव (ता. फलटण) येथे फक्त सूक्ष्म प्रतिबंधिक क्षेत्र आज रोजी अस्तित्वात असल्याचे स्पष्ट केले.  

Previous Post Next Post