युवकाचा नदीत बुडून मृत्यू
स्थैर्य, सातारा, दि. 06 : सातारा तालुक्यातील म्हाते खुर्द येथील संकेत भैरवनाथ दळवी व 19 या युवकाचा वेणा नदीत बुडून मृत्यू झाला.

संकेत आज शनिवारी सकाळी वेणा नदीत आपल्या मित्रांसह होण्यासाठी गेला होता पोहताना एका मित्राला दम लागला म्हणून त्याला मदत करण्यासाठी संकेत गेला. मात्र तो गाळात रुतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सुमारे एक तास संकेत चा नदीत शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
Previous Post Next Post