अज्ञात वाहनाने ठोकरल्याने आदर्की फाटा येथे दुचाकीच्या अपघातात 1 ठार
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. 09 : गुरूवार दिनांक 9 रोजी सकाळी 7:30 वा च्या सुमारास वाठार स्टेशन बाजूकडून जाणारी मोटारसायकल क्रमांक MH 50 R 2590 या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने कराड तालुक्यातील चोरे येथील युवक महेश सतीश देशमुख वय 26 ठार झाला. वाठार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाठार स्टेशन ते  फलटण रोडववरील आदर्की फाटा येथील धाब्या जवळ एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोराची धडक देऊन त्या ठिकाणाहून निघून गेला. सदर जखमीस ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच मोटरसायकल चालक मयत झाला होता. सदर अपघाताची  खबर मिळताच वाठार पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी  उपस्थित झाले. पुढील तपास एएसआय गुजर करीत आहेत.
Previous Post Next Post