जिल्ह्यातून 5 टोळीतील 17 गुंड तडीपार - सातारा पोलिस अधीक्षकांची कारवाई
स्थैर्य, सातारा, दि. 30 : सातारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज धडक कारवाईत करत जिल्ह्यातून 17 गुंड व अवैध धंदे चालवणर्‍यांवर तडीपारीची कारवाई केली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, जनतेस कोणताही उपद्रव होवू नये याकरीता प्रतिबंधक उपाय योजना म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

तडीपारी कारवाई याप्रमाणे झाली आहे

मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार व बेकायदेशीर दारु विक्री करणार्‍या टोळीचा प्रमुख दिपक शामराव वारागडे, वय  45 वर्षे रा. कुडाळ, ता. जावली, जि. सातारा, सुनिल गोविंद गावडे, वय - 32 वर्षे (टोळी सदस्य) रा. कुडाळ, ता. जावली, जि. सातारा, प्रविण रामचंद्र वारागडे, वय - 44 वर्षे, (टोळी सदस्य), रा. कुडाळ, ता. जावली, जि. सातारा यांच्याविरुद्ध सपोनि एन. एम. राठोड यांनी हद्दपारीचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक यांनी या टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे 1 वर्षे सातारा जिल्हयातून हद्दपार आदेश केला आहे.

उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी, गर्दी मारामारी करणार्‍या टोळीचा प्रमुख अविनाश उर्फ भैय्या बापु जाधव (25), अक्षय बापु जाधव वय 21 वष (टोळी सदस्य), समीर सुधीर दुधाणे वय 24, प्रकाश जयसिंग जाधव वय 30, रुपेश रविंद्र घाडगे वय 20, संतोष सुभाष कांबळे, वय - 20, सर्व रा. उंब्रज, ता. कराड यांच्याविरुद्ध उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि ए.एल.गोरड यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेकडे पाठविला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी या टोळीस 1 वर्षे जिल्ह्यातून हद्दपार आदेश केलेला आहे.

शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरीचोरी, मारामारी करणारे टोळीचा प्रमुख अनिल सुरेश धांडे वय 21 वर्षे रा. बाफना स्टील दुकानाचे पाठीमागे, मोळाचा ओढा, सातारा, शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव वय 24 वर्षे (टोळी सदस्य), रा. जाधव चाळ, सैदापूर, पो. कोंडवे, ता. जि . सातारा यांच्याविरुध्द शाहुपुरी सातारा शहर, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करत असल्याने त्यांच्याविरुध्द शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पो. नि. एम. बी. पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी या टोळीस 1 वर्षे जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिले आहे.

सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत सरकारी कामात अडथळा आणून सरकारी नोकरास मारहाण करणे, वाहन चोरी करणार्‍या टोळीचा प्रमुख राहुल रमेश गुजर वय 27 वर्षे रा. गोळीबार मैदान गोडोली सातारा, शंभो जगन्नाथ भोसले वय 21 वर्षे ( टोळी सदस्य ) रा . भोसले कॉलनी, कोडोली, ता. जि. सातारा यांच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. पी. डी. जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक यांनी या टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे 1 वर्षे जिल्हयातुन हद्दपार आदेश केलेला आहे.

पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी, घरफोडी, चोरी, खुनाचा प्रयत्न करणारे टोळीचा प्रमुख दिपक नामदेव मसुगडे वय 22 वर्षे, नामदेव बबन मसुगडे वय 22 वर्षे (टोळी सदस्य) नवनाथ अशोक जाधव वय - 20 वर्षे, दत्तात्रय दादासाो मसुगडे सर्व रा. रणसिंगवाडी, ता. खटाव, जि. सातारा यांचे विरुद्ध दहिवडी, पुसेगाव, फलटण ग्रामीण, पोलीस ठाण्याचे हद्दीत गुन्हे करीत असल्याने त्यांच्याविरुध्द पुसेगाव पोलीस ठाणेचे स.पोनि. व्ही. बी. घोडके यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेकडे पाठवला होता. त्यात पोलीस अधीक्षक यांनी या टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे 1 वर्षे माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यातुन हद्दपार आदेश केलेला आहे. वरील पाचही टोळीतील गुंडांना सुधारण्याची संधी देवूनही सुधारणा झाली नाही. त्यांच्या बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी अखेर हद्दपारीचे आदेश केलेले आहेत. आगामी काळात याच प्रकारची योजना जलद गतीने राबविली जाणार आहे.
Previous Post Next Post