20 जणांना आज डिस्चार्ज ; 240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर
दोन कोरोना बाधितांचा आज मृत्यु


स्थैर्य, सातारा दि. 30 : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 20 नागरिकांचा आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये कराड तालुक्यातील सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला, तुळसण येथील 54 वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला
जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय महिला, शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40, 56 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालक
माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय महिला
सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष, राजापुरी येथील 31 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका  यांचा समावेश आहे.

240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 40, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 26, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 25, शिरवळ येथील 32, रायगाव येथील 25, पानमळेवाडी येथील 19, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 2 व पाटण येथील 4 असे एकूण 240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने  एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दोन बाधितांचा मृत्यु

काल रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या दोघांना 10 दिवसापूर्वी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे दाखल करण्यात आले होते.

▪️ घेतलेले एकुण नमुने 13240 ▪️ एकूण बाधित 1044 ▪️ घरी सोडण्यात आलेले 740 ▪️ मृत्यु 45 ▪️ उपचारार्थ रुग्ण 259 
Previous Post Next Post