सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल सुमारे 44 लाख रुपयाचा दंड वसूल
स्थैर्य, सोलापूर, दि. 23 : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वारंवार विविध माध्यमातून आवाहन केले आहे. मास्क न वापरल्यास आर्थिक दंड करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 43 हजार प्रकरणात नागरिकांना दंड करण्यात आला असून त्यांच्याकडून 44 लाख 19 हजार 260 रुपये आजपर्यंत वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. याबाबतच्या एकूण कारवाईत आतापर्यंत 89 लाख 19 हजार 561 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, वाहनावरुन मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखूचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. 6 जुलैपासून  ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी 40972 प्रकरणात 65 लाख 51  हजार 601 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सर्व तहसीलदार कार्यालयाने  11565 प्रकरणात 16 लाख 79 हजार 100 रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 5339 प्रकरणात 6 लाख 88 हजार 860 रुपयांचा दंड वसूल केला.

दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी      मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, वयस्कर लोकांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन केले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.