कोयना धरणात 48 .87 टीएमसी पाणीसाठा
स्थैर्य, सातारा, दि. 21 : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरण अंतर्गत सर्व विभागासह पाटण तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे .यापूर्वी झालेल्या पावसामुळे धरणांत अंतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे ,धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी 13 हजार 884 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे .तसेच याच वेळी धरण पायथा वीज गृहातून वीज निर्मिती करून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद केल्याने धरणात संथ गतीने परंतु अपेक्षित पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

सध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा 48.87 टीएमसी इतका झाला आहे. गेले चार दिवसात कोयना धरणातील कोयना, नवजा, महाबळेश्‍वर आदी ठिकाणी अपेक्षित पाऊस पडत नाही. अधून मधून हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे सध्या होत असलेल्या हलक्‍या पावसाचा  सरीमधून धरण परिसरात प्रतिसेकंद सरासरी 13 हजार 183 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. याच वेळी धरण पायथा वीज प्रवाहातून प्रतिसेकंद पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणारे 2111 क्युसेक्स पाणी आता बंद करण्यात आले आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी ही सध्या पाण्याची मागणी कमी असल्यामुळे धरणातील पाण्याची आवक ही पाणीसाठ्यात वाढ करणारी ठरत आहे. सध्या धरणात 48.87 टीएमसी पैकी उपयुक्त साठा 43.87 टीएमसी असून पाणी उंची 2105.11 फूट जलपातळी 641.883 मीटर इतकी झाली आहे १ जून २०२० पासून आजपर्यंत कोयना येथे 1,644 मिलिमीटर नवजा येथे 783 मिलिमीटर महाबळेश्वर येथे सोळाशे 83 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.