दोन जणांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
स्थैर्य, सातारा, दि. २३ : सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु आहे. तो कायदा पायदळी तुडवणाऱ्या दोन जणांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बापुराव केंडे (वय -42 वर्षे रा.56, मंगळवार पेठ, जंगीवाडा, सातारा), नासीर मेहबुब बागवान (वय -34 वर्षे रा.251, बुधवार पेठ) अशी दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी वेळोवेळी आदेश काढुन लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरु नये म्हणुन लकडाऊन केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हयात अधिसुचना काढुन साथरोग प्रतिबंध कायदा 1987 हा 13 मार्च 2020 पासुन लागु केला आहे. दि .22 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास हवालदार पंकज मोहिते आणि त्यांच्यासोबत पो.ना. माने, पो.ना. कुंभार, पो.क. यादव असे शाहुपुरी पो स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. जंगीवाडा येथील समाजमंदिरासमोर विजय बापुराव केंडे हा भाजी विक्री करीत होता. त्याच्यासमोर लोकांची गर्दी जमली होती. तर पो. ना. कुंभार यांना रात्री 9.30 च्या सुमारास बुधवार नाका येथे कंन्टेंटमेट झोन असताना देखील नासीर मेहबुब बागवान (वय -34 वर्षे रा .251, बुधवार पेठ) हा बांधकामाचे साहित्य बाहेरून आतमध्ये आणत होता. आदेशाचा भंग करून भाजी विक्री व तसेच कंन्टेंटमेंट झोन मध्ये ग्रीटची ने आण केली आहे. म्हणुन त्या दोघांवर भा.द.वि .188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 (ब) , महाराष्ट्र कोविड अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 
Previous Post Next Post