अमरावती जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत संचारबंदीचा आदेश जारी
स्थैर्य, अमरावती, दि. 30 : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी उपाययोजनांत जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हा  आदेश निर्गमित केला.

त्यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. बाजारपेठा, दुकाने भाजीपाला, फळे यार्ड, पेट्रोल पंप, सलून,बँका आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश ३१ जुलैपर्यंत कायम राहतील.

या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास पोलीसांनी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Previous Post Next Post