अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार : रामदास आठवले
स्थैर्य, मुंबई, दि. ३१ : अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्यचं आठवलेंनी सांगितलं.

गायक आनंद शिंदे यांनीही अयोध्येत बौद्धविहाराची मागणी केलीय. मात्र, आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण बौद्धविहारासाठी प्रयत्नशील असल्याचं आठवलेंनी म्हटलंय.

"अयोध्येत आता राम मंदिर उभं राहत आहे. तिथे राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्याआधी तिथे बौद्ध मंदिर होतं. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरू आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन 30 एकर जागा खरेदी करणार," असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
Previous Post Next Post