अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खंडाळा येथे एकाच खून



स्थैर्य, खंडाळा, दि. २० : बायकोशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून खंडाळा येथील आसिफ गुलाब शेख वय 23 या तरूणावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी अक्षय सुनिल मोहिते वय 22 रा. अजनुज व अमित चव्हाण रा. दुध डेअरीजवळ यां दोघाना अटक केली आहे.

रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पारगांव - खंडाळा एसटी डेपो समोर ही घटना घडली. आसिफ शेख याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अक्षय मोहिते यास होता. याच कारणातून  दोघांच्यात वादावादी, शिवीगाळ झाली. रागाच्या भरात अक्षय मोहिते याने आसिफ शेख याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. छाती, बरगड्या व मांडीवर वार झाल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली. शिरवळ पोलीस ठाण्याचे पो. नि. उमेश हजारे, डीवायएसपी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सुचना दिल्या. पोलीसांनी रात्रीच संशयित आरोपी अक्षय मोहिते यास अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार करीत आहेत.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.