डॉ. अमोल कोल्हे क्वारंटाइन, कोरोना पॉझिटिव्ह नेत्यांच्या संपर्कात आल्याने निर्णय
स्थैर्य, पुणे, दि ०९ : राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःला क्वारंटाइन केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"मी एक डॉक्टर असल्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपल्या कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या भावनेतून होम क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करून दिली आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच आहे. सर्वसामान्य नागरिकांसह अनेक नेत्यांनाही करोनाचा संसर्ग झाला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.
Previous Post Next Post