अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आदित्य ठाकरे विठ्ठल मंदिरातून आले होते बाहेर, पाहा VIDEO
स्थैर्य, पंढरपूर, 01 : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपत्नीक विठ्ठलाची महापुजा केली. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा उपस्थितीत होते. परंतु, महापूजा सुरू असताना अचानक आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागले आणि ते मंदिरातून बाहेर पडले होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रथेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा पार पडली. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे पंढरपूरमध्ये येण्यास मनाई करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहपत्नीक मंगळवारी रात्री पंढरपुरात दाखल झाले होते. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थितीत होते.


Previous Post Next Post