मार्डीत सोसायटी व विकास अधिकार्‍यांच्या विरोधात सौ. पोळ करणार आज आत्मदहन
स्थैर्य, दहिवडी, दि. 30 : मार्डी, ता. माण येथील स्व. सदाशिवराव पोळ वि. का. स. सेवा सोसायटी व विकास अधिकारी गावडे यांनी संगनमताने सन 2020-21 मधील डाळींब पीककर्जाचे बोगस वाटप केले आहे.

सोसायटीची सभासद असून व खात्यावर डाळींब असूनही पीककर्जासाठी विकास अधिकारी गावडे यांनी दहा हजार रूपये लाचेची मागणी करत अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार मार्डी, ता. माण येथील सौ. वर्षा शिवाजी पोळ यांनी केली असून याविरोधात आज दि. 31 जुलै रोजी त्या मार्डी, ता. माण येथील त्यांच्या शेतात आत्मदहन करणार आहेत.
Previous Post Next Post