राष्ट्रवादी भवनात अजित पवार यांचा वाढदिवस साजरा
स्थैर्य, सातारा, दि. 22 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने येथील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हाध्यक्ष  सुनील माने यांच्या हस्ते केक कापण्यात आला. दरम्यान, सातारा आणि नागठाणे येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, दीपक पवार, राजकुमार पाटील, महिला अध्यक्षा समिंद्रा जाधव, विद्यार्थी अध्यक्ष अतुल शिंदे, अल्पसंख्याक अध्यक्ष शफीक शेख, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न बाबर, सचिन बेलागडे,निवास शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी राष्ट्रवादी सेवादलातर्फे जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नागठाणे येथे अल्पसंख्याक सेलच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अशोकराव जाधव, स्मिता देशमुख, नाना इंदलकर, दीपिका घाडगे, बाबा सय्यद, हणमंत जाधव, बाळासाहेब शिंदे, मारुती इदाटे, पूजा काळे, गोरख कदम, अक्षय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.