जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचे बाजार 31 जुलैपर्यंत बंद
स्थैर्य, सोलापूर, दि. 30 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज 30 जून रोजी आठवडी बाजार बंद  करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे.
     
सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स आता दिनांक 31 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.
Previous Post Next Post