अनपटवाडीकरांनी घाबरून जाऊ नये - मंगेश धुमाळ


अनपटवाडी ता कोरेगाव येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून माहिती घेतेवेळी मंगेश धुमाळ, गुलाब जगताप आदी.


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. २४ (रणजित लेंभे) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे अनपटवाडी येथिल रहिवास्यांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केले अनपटवाडी तालुका कोरेगाव येथील तीन कोरणा बाधित रूग्ण आढळल्यानंतर धुमाळ यांनी गावातील कंटेनमेंट झोनला भेट देऊन प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्‍याच्या सूचना दिल्‍या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत गावात सर्वे करण्यात येत असून नागरिकांनी कुठेही गर्दी होणार नाही याची  काळजी घ्यावी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच मास्क व सॅनिटाइजर याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती वाठार स्टेशन आरोग्य केंद्राचे डॉक्टर आदित्य गायकवाड यांनी दिली यावेळी कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गुलाबबापू जगताप, माजी सरपंच गजानन बोबडे हनुमंतराव पाटील, संजय मुळीक, सुरेश बोबडे ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते . 
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya