अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्याला अटक; ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिसांकडून जप्त


स्थैर्य, फलटण : ढवळेवाङी, आसू ता. फलटण येथे नीरा नदीच्या पाञातील वाळू बेकायदेशीर बीगर परवाना चोरुन नेहणाऱ्या रोहन गावडे याला फलटण ग्रामिण पोलीसांनी अटक केलेली आहे. त्याच्या ताब्यातील वाळू वाहतूक करणारी ट्रॅक्टर व ट्रॉली जप केली आहे.  याबाबतची फिर्याद आसूचे तलाठी मनोहर सगभोर यांंनी दिली असून ढवळेवाङीचे उपसरपंच निखिल विठ्ठल पवार यांंनी नीरा नदीच्या पाञातील वाळू चोरी होत असल्याची माहिती फोनवरून दिल्यानंतर तेथे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या आदेशानुसार पथक पाठविण्यात आले. परंतु त्यांना गुंगारा देऊन पाऊण ब्रास वाळू वाहतूक करणारी ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन रोहन गावङे निघून गेला होता. तलाठी यांच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली. 
Previous Post Next Post