खटकेवस्तीच्या उपसरपंच पदी सौ. वैशाली गावडे


स्थैर्य, फलटण : फलटण पूर्वभागातील अत्यंत राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या खटकेवस्तीच्या उपसरपंच पदी वैशाली नवनाथ गावडे यांची निवड नुकतीच करण्यात आलेली आहे. फलटण पूर्वभागातील माजी सभापती सौ. वैशाली बापुराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खटकेवस्ती ग्रामपंचायतची वाटचाल सुरू आहे. खटकेवस्ती ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. वैशाली नवनाथ गावडे-पाटील यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर,  गोखळीचे सरपंच मनोज गावडे, खटकेवस्तीचे सरपंच व युवा नेते बापूराव गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सौ. गावडे यांचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post