भैरवनाथ कृषी सेवा केंद्र अल्पावधीतच लोकप्रिय ठरेल : श्रीमंत विश्वजितराजे; करोना विषयी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करा


स्थैर्य, दुधेबावी : आगामी काळामध्ये नांदल व परिसरातील शेतकर्यां शेती विषयी लागणाऱ्या गोष्टी घेण्यासाठी फलटणला येण्याची किंवा अन्य कोठेही जाण्याची गरज लागणार नाही. कोळेकर यांनी सुरु केल्याला कृषी सेवा केंद्रामार्फ़त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात याव्यात. नांदल ता.फलटण येथे श्रीकांत कोळेकर यांनी सुरू केलेल्या भैरवनाथ कृषी सेवा केंद्र अल्पावधीतच लोकप्रिय ठरेल, असा विश्वास फलटण पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी उद्घाटनादरम्यान व्यक्त केला.

सरपंच मोहिते, नामदेव कोळेकर, क्रुषी सहाय्यक कुलदीप नेवसे, ज्ञानदेव कोळेकर, दत्तात्रय कोळेकर, शिवाजी कोळेकर, महेंद्र कोळेकर, विनायक कोळेकर, दौलत कोळेकर, पाटलू कोळेकर यांच्या सह नांदल गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण शहरासह तालुक्यामध्ये करोना या आजाराचे नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण सध्या फलटण तालुक्यामध्ये वाढत चालेले आहे. फलटण तालुक्याची एकूण करोना पॉझिटिव्ह असलेली रुग्ण संख्या शंभरच्या पुढे गेलेली आहे. आता करोना बरोबर जगता आले पाहिजे. ते जेव्हा आपल्याला जगता येईल तेव्हाच आपण या परिस्थितीवर मात करू शकतो. आता सर्व नागरिकांनी शासनाने दिलेले नियम म्हणजेच सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेर पडल्यावर चेहऱ्यावर मास्क वापरणे व वारंवार हात धुणे हे नियमितपणे केले पाहिजे. त्याशिवाय नागरिकांकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही व जर पेशंट आपल्या शहरासह तालुक्यामध्ये वाढले, तर त्याचा सर्वच घटकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनी करोना या आजाराची काळजी घेऊनच आपले दैनंदिन व्यवहार करणे गरजेचे आहे. कोणतीही अडचण आली तरी आम्ही सर्व जण श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सोबत सदैव राहणार आहे, तरी घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घेत करोनाशी दोन हात करावेत असे आवाहन फलटण पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी केले.
Previous Post Next Post