ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलचा एसएससी परीक्षेचा निकाल 100%


स्थैर्य, फलटण : येथील सद्गुरू प्रतिष्ठान संचलित ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीच्या एसएससी परीक्षेचा निकाल 100% लागलेला आहे.       ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये प्रथम क्रमांक कु. साक्षी सुनील बिडवे, व्दितीय क्रमांक कु. सिद्धाली अनुप शहा, तृतीय क्रमांक यशोदीप विजय रणदिवे यांना मिळाला असून २६ विद्यार्थी हे डिस्टिंगशन घेऊन तर ११ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. 

उत्तीर्ण  झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, चेअरमन सौ. मधुबाला भोसले, सेक्रेटरी रणजीतसिंह भोसले, व्यवस्थापकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, मुख्याध्यापक डॉ. प्रफुल अडागळे व इतर सर्व संस्था पदाधिकारी तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
Previous Post Next Post