‘रयत’वर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची वर्णी
स्थैर्य, सातारा, दि. २१ : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत सन 2020-21 ते 2022-23 या कालावधीसाठी विविध पदांच्या निवडी झाल्या. संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून  डॉ. अनिल पाटील यांची एकमताने निवड झाली तर संस्थेचे व्हा. चेअरमन म्हणून  ऍड. भगीरथ शिंदे यांची निवड झाली. त्याचबरोबर संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, निलीमा पोळ, आमदार रोहित पवार यांचीही वर्णी लावण्यात आली आहे.

  मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव म्हणून धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, माध्यमिक विभागाचे सहसचिव म्हणून आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नागपुरे, संस्थेचे ऑडिटर म्हणून सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार रोहित राजेंद्र पवार, स्व. वाघोजीराव पोळ यांच्या स्नुषा सौ. निलीमा सुनील पोळ, अरुण गणपती लाड, मिलिंद हरिभाऊ माने, राहुल सुभाष इंग्रोळे, सुभाषलाल शंकरलाल गांधी, अरविंद रामभाऊ तुपे, विनय गोपीकिसन पाटील, ऍड. के. एस. खामकर, श्रीमती विजयमाला पतंगराव कदम, सदाशिवराव पाटील, अमोल हणमंतराव पाटील, डॉ. प्रदीप गोविंदराव शिंदे, यांची एकमताने निवड करण्यात आली.

याशिवाय संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे निमंत्रित सदस्य म्हणून जयसिंगराव आनंदराव उर्फ राजेंद्र फाळके, आबासाहेब देशमुख, चंद्रकांत दळवी, ऍड. दिलावरसाहेब मुल्ला, बाळासाहेब बोठे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या पाच विभागाचे विभागीय सल्लागार मंडळाचे चेअरमन म्हणून  संजीव पाटील (मध्य विभाग), माधवराव मोहिते (दक्षिण विभाग), आमदार आशुतोष काळे (उत्तर विभाग), ऍड.राम कांडगे (पश्चिम विभाग), आमदार बाळाराम पाटील (रायगड विभाग) यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे.

निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या बैठकीस मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री डॉ. विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
Previous Post Next Post